पोलिस अधीक्षक साहेब चकलांबा पोलिस ठाणे दारांना कायदा सुवैस्था शिकवा
[ ज्ञानेश्वर हवाले ]
उमापुर दि ९ ( वार्ताहार ) येत्या एक-दोन दिवसांमध्ये आजादी का अमृत महोत्सव म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात संपूर्ण देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार असताना जातीतील समाजातील भेदभाव आजही ७५ वर्षानंतर ही कायम असल्याचा घटना देशात रोज घडत आहेत. अशीच घटना गेवराई तालुक्यातील हिवरवाडी गायरान येथील पारधी समाजाच्या महिलेसोबत घडली आहे. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनच्या समोर या महिलेला जवळपास पाच-सहा गाव गुंडांनी बेदम मारहाण केली. पोलिस स्टेशन समोर मारहाण होत असताना तेथील पोलिस प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली अशी तक्रार पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे संबंधित महिला व तिच्या पतीने केली आहे.
किरकोळ कारणावरून गावातील एक राजकीय व्यक्ती तय्यब भाई रशीद भाई व त्याचे पाच ते सहा सहकारी यांनी मिळून या पारधी महिलेला व तिच्या पतीला पोलिस स्टेशनला ये आपणाला तुमच्यासोबत थोडे बोलायचे आहे असे म्हणत बोलावून घेतले व शाब्दिक बाचाबाची होताच तय्यब भाई रशीद भाई याने व त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांनी या पारधी महिलेला व तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये महिलेला मारहाण करीत तिच्या पतीलाही मारहाण करण्यात आली. यामध्ये चेहऱ्यावर व दातालाही इजा झाली आहे. भर पोलिस स्टेशन समोर एखाद्या महिलेचा असा विनयभंग व्हावा ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी आहे.
घटना घडल्यानंतर या महिलेने व तिच्या पतीने चकलांबा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना आमच्यावर झालेला गुन्हा यासंबंधी आमची तक्रार घ्या अशी विनंती केली असता तेथील पोलिस प्रशासनाने यांची तक्रार घेतली नाही. देशात एका बाजूला एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते तर त्याच देशात एका आदिवासी महिलेवर भर दिवसा पोलिस स्टेशन समोर गाव गुंडाकडून तिचा विनयभंग होतो ही कुठली न्याय व्यवस्था आहे? असा प्रश्न संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी एसपी ऑफिस कार्यालय येथे उपस्थित केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष देऊन या प्रकरणी जबाबदार पोलिस अधिकारी तथा गावगुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पिडीत येवराबाई श्रीकृष्ण चव्हाण यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना केली आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...