January 22, 2025

आझादी का अमृत महोत्सवाचा “डोंगरावर” घुमला नारा..!

गेवराई तहसील प्रशानाच्या वृक्षारोपण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद;चार हजार रोपट्यांची झाली वृक्ष लागवड

गेवराई दि. 30 ( वार्ताहर )  येथील तहसील प्रशासनाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव, या उपक्रमांतर्गत शनिवारी ता. 30 रोजी तालुक्यातील तलवडा येथील त्वरिता देवीच्या डोंगरावर सकाळी 8 वाजता 4 हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम उत्साहात पार पडला.या वृक्ष लागवड मोहिमेत विविध सामाजिक संघटना, प्रशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटना व वृक्ष प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत सकाळी 8 पासून दु. 12 वाजेपर्यंत चारशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी सचिन सानप, युवा नेते शिवराज पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, बांधकाम विभागाचे उप अभियंता भोरे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक एम.एस.चिंचोळे, पंचायत समिती सदस्य प्रा.शाम कुंड, सरपंच विष्णुपंत हात्ते, बालग्राम परिवाराचे संतोष गर्जे, गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, वनविभागाचे गाडेकर, दत्ता माने यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठी, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने सर्वत्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल टिकून रहावा यासाठी हा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन हा उपक्रम राबविण्यात येत असून गेवराई तहसील कार्यालयाच्या वतीने तलवाडा येथील त्वरिता देवी मंदिर परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, गेवराई तालुका पत्रकार संघ, रायगड प्रतिष्ठान, जयहिंद स्पोर्ट क्लब, छत्रपती मल्टिस्टेट परिवार, मंगलनाथ मल्टिस्टेट परिवार, सहारा बालग्राम परिवार, पतंजली योग समिती, खडी क्रॅशर संघटना, डॉक्टर असोसिएशन, शिक्षक संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप, संघर्ष धान्य बँक, यांच्यासह विविध सामाजिक संघटना, पत्रकार बांधव, शिक्षक, शालेय विद्यार्थी आणि वृक्ष प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. वनविभागाच्या वतीने चार हजार रोप उपलब्ध करून देण्यात आले होते. सदरील उपक्रम तहसिलदार सचिन खाडे यांच्या नियोजनाखाली उत्साहात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *