तसं पहायला गेलं तर माणूस खूप संवेदनशील प्राणी आहे पण संकटात प्रत्येकाला गरज असते ती आधाराची, पाठबळाची त्यात जर आजारपणाशी झुंज असेल तर माणूस आतून खचून जातो. आपण मागील दोन वर्षे कोविडच्या विळख्यात होतो. प्रत्येक जन घाबरला होता, भितीने जवळच्या नात्यात दुरावा निर्माण झालेला आपण पहिला. रोज निघणारे पेशंट, वेळेत न घेतलेला उपचार यामुळे बरेच जवळचे माणसं आपण दगावलेली पाहिलीत. या सर्व घडामोडीत फक्त डॉक्टर देव आणि हॉस्पिटल मंदिरे वाटली होती. सर्व सामान्य लोकांचा सरकारी दवाखण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण तसा चांगला नाही. कारण काय तर तिथे लक्ष दिले जात नाही, अपु-या सोयी सुविधा, अशा अनेक कारणाने आपण त्या आरोग्यसेवेला दुय्यम स्थान देत आलेलो आहोत. पण जुने जाणते लोक आजही प्रथम प्राधान्य हे सरकारी दवाखान्याला देतात. हि बाब विसरून चालणार नाही. अमाप पैसा ओतून खाजगी इलाज एकीकडे तर अत्यल्प शुल्कात रुग्णांची काळजी घेत सेवा देणारे सरकारी ग्रामीण रुग्णालय एकीकडे हा फरक तेव्हाच लक्षात येतो जेव्हा आपल्या घरातील कुणी तिथे अडमिट असतात, किंवा घरातील महिला बाळंतपण करण्यासाठी अडमिट असेल तर, पैश्याने सर्व विकत घेता येईल पण काळजी विकत घेता येत नाही आणि अशी काळजीवाहू माणसं डॉक्टर व कर्मचा-यांच्या रूपाने फक्त सरकारी दवाखाण्यात (सिव्हील हॉस्पिटल) पहायला मिळतात. मी तर म्हणेन अशी काळजी घेणारे लोक असतील तर कितीही मोठे आजारपण असू दया कुणालाच काही घाबरण्याचे करण नसेल.
मला आलेला अनुभव मला हर्नियाचा त्रास होत होता, खूप दिवस दुर्लक्ष केले पण त्रास वाढू लागल्याने मी काही जणांचा सल्ला घेतला. काही खाजगी दवाखाने फिरलो पण अवाढव्य ऑपरेशन खर्च बघून एक वेळ त्रास परवडला असं वाटू लागलं. कारण काही दिवसापूर्वीच वडिलांना आजारपणात नगरच्या नामाकिंत खाजगी हॉस्पिटलला इलाज केल्याने खर्च खूप झाला होता, त्यामुळे माझ्या त्रासापेक्षा खर्चाचा त्रास जास्त वाटत होता. पण सरकारी हॉस्पिटलला विचारपूस करावी म्हणून गेलो. अतिशय छान अनुभव आला. डॉ. चिचोळकर सरांनी माहत्मा ज्योतीराव फुले या आरोग्य योजने अंतर्गत विनाखर्च ऑपरेशन करता येईल. हा सल्ला दिला. सरांच्या या आधारदायी बोलण्याने मला खूप दिलासा मिळाला. पण लोक म्हणतात सरकारी काम अन बारा महिने थांब पण मला याउलट अनुभव आला.योग्य कागदपत्राची पूर्तता केली कि, ऑपरेशन तारीख देण्यात आली. 11 जुलै रोजी अडमिट झालो. 12 जुलै ला वैदकीय क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्याने समस्त बीड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले डॉ. महादेव चिचोळकर यांनी भूलतज्ञ डॉ. राजेश शिंदे, डॉ. सराफ, डॉ रांदड यांच्या विशेष सहकार्यातून ऑपरेशन यशस्वी रित्या पूर्ण केले. खाजगी रुग्णालयात पैसे देऊनही जितकी काळजी घेतली जात नाही तितकी काळजी या शासकीय दवाखण्यातील सर्व कर्मचारी यांनी घेतली सिस्टर यांनी वेळोवेळी जेवण केले का? गोळ्या घेतल्या का?काही त्रास होतो का? या सहानुभूतीने विचारलेल्या प्रश्नांनी माझ्या मनात आजाराविषयी जीकाही भीती होती ती घालवण्याचे काम केले. दहा दिवस कसे गेले ते कळाले पण नाही. त्रासातून मुक्त झालो अन आपुलकीने काळजीने भाराऊन गेलो. सर्व डॉक्टर्स, सर्व स्टाफ यांचे शब्दातून ऋण व्यक्त होऊच शकत नाही.खरंच एकदा या सरकारी दवाखाण्यात इथल्या औषधी सह आदरयुक्त व काळजीने पेशंट लवकर बरा होतो हाच मला आलेला अनुभव आहे. आज कितीही सुविधायुक्त खाजगी हॉस्पिटल होऊदया आज कितीही तंत्रज्ञानाने विकसित इंग्लिश, सेमी इंग्लिश स्कूल येऊ दया सरकारी दवाखाना न अन सरकारी शाळा यांच्या गुणवत्तेशी तडजोड होऊच शकत नाही. असं मला वाटू लागले आहे.ग्रामीण रुग्णालय गेवराई येथील सर्व डॉक्टर आणि तेथील स्टाफच्या निस्वार्थ सेवेला माझा सलाम..!
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...