January 22, 2025

पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द;शेतकऱ्यांना मोठा दिलासा

बीड दि. १७  ( वार्ताहार ) : पीक विमा ‘भरण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद सक्तीची करण्यात आली होती. मात्र ई पीक पाहणी ऑगस्ट नंतर नोंदविली जात असल्याने त्याचा परिणाम पीक विमा भरण्यावर होत होता. आता अखेर शासनाने ती अट रद्द केली आहे. यामुळे पीक विमा भरु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात सध्या खरीपाच्या पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात पीक विमा योजनेत काही शेतकऱ्यांनी बोगसगिरी केल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद सक्तीची करण्यात आली होती. असे असताना पीक पाहणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होते आणि पीक

विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. अशा परिस्थितीत पीक विमा भरायचा कसा अशी अडचण अनेक शेतकऱ्यांसोबत निर्माण झाली होती. ई. पीक पाहणीची ही अट रद्द करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पीक विमा भरणाऱ्यांच्या संखेत निश्चितपणे वाढ होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *