January 22, 2025

ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर, नगरपालिका निवडणुकांवरही टांगती तलवार

दिल्ली दि. १३ (वृत्तसंस्था) मागील काही काळापासून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. आज सर्वोच न्यायालयात यावर सुनावणी झाली असून निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तसेच बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून पुढील सुनावणी १९ जुलैला होणार आहे. महाराष्ट्राने न्यायालयात ट्रिपल टेस्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील ओबीसी आरक्षण मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच जेथे निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली नाही तेथे हि प्रक्रिया एक आठवडा पुढे ढकलण्याचे निर्देश देखील सर्वोच न्यायालयाने दिले आहेत.

बटिया समितीचा अहवाल राज्य शासनाने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. मात्र आयोगाच्या अहवालाचा आम्हाला अभ्यास करायचा आहे असे सांगत न्यायालयाने आता सुनावणी १९ जुलै पर्यंत पुढे ढकलली आहे. त्याचेवेळी आता नव्याने निवडणुका जाहीर करू नका असेही न्यायालयाने आयोगाला सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राकडून न्यायालबात ट्रिपल टेस्टची अट पूर्ण करण्यात आली आहे. तसेच बांठिया आयोगाचा अहवाल देखील नादा करण्यात आला आहे. पण यावर अद्याप चर्चा झाली नाही. आगामी निवडणुका म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला वेळ दिला आहे.

नगरपालिका निवडणुकांचे काय होणार ?

पण ज्याठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. त्याठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी ओचांनी आरक्षणाविना निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीबाबत ज्याठिकाणी अद्याप प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. तेथील निवडणुका एक आठवडा पुढे ढकलण्यात याव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात येत्या काळात ९४ नगरपालिका आणि ४ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं परिपत्रक २० जुलै रोजी निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात येणार आहे. तर १९ जुलै रोजी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. कायदेची अधिसूचना जरी झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असे समजण्यात येते. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी तांत्रिक दृश्या अद्याप नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरु झालेली नाही. त्यामुळे नगरपालिका निवडणुका लांबणीवर पडतील असेच चित्र सध्या तरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *