मराठवाडा ही साधु संतांची भुमी आहे याच मराठवाड्यामध्ये अनेक साधु संत जन्माला आले आणि आपले जिवन भागवत धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य भगवंत सेवेसाठी समर्पित केलेले आहे याच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सोळाव्या शतकात स्वानंद सुखनिवासी सचिदानंद स्वरूप संत नारायण महाराज यांनी स्थापन केलेल्या श्री क्षेञ नारायण गड ही धाकटी पंढरी अशी आपली ओळख निर्माण केली आहे.आषाढी निमीत्त जे भाविक श्री क्षेत्र पंढरपुर ला जाऊ शकत नाहीत ते धाकटी पंढरी म्हणुन संबोधल्या जाणारया श्री क्षेत्र नारायणगड येथे जाऊन विठठल रूक्मिनी व नगदनारायण महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतात.
श्री क्षेत्र नारायणगड हे तिर्थक्षेत्र बीडच्या वायव्य दिशेस असुन ते बीडपासुन 21 किलोमीटर अंतरावर आहे हे तिर्थक्षेत्र ज्या डोंगरावर आहे त्याची दक्षिणोत्तर लांबी किमान सात किलो मिटर असुन पुर्व पश्चिम रूंदी तिन किलोमीटर आहे या डोंगराचे विशेष वैशिष्टये असे की हा डोंगर कोणत्या ही दिशेने पाहिल्यास तो अर्ध चंद्राकृती दिसतो.तसेच नारायण गड हे संस्थान अति प्राचीन असून तेथे स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी दर बारा वर्षाला एक नविन लिंग तयार होते ते आजही भक्तांना पहायला मिळते व तेथील विठठल रूक्मिनी ची मुर्ती ही स्वयंभू असुन प्रत्यक्ष नगदनारायण महाराज यांना भेटण्या करिता नारायण गडावर आले म्हणून त्यांच्या बद्दल असे म्हटले जाते
नदी गौतमीच्या तटी जन्म झाला अदि ब्रम्हवेदांत तपे पुर्ण केला ॥दिली भेटी देवे आले पंढरी ला नमस्कार माझा श्री सदगुरू नगदनारायण महाराजांना ॥नगदनारायण महाराजांचा जन्म गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील पाटील घराण्यात नगदनारायण महाराज यांनी अवतार घेतला ते पांडुरंगाचे ते भक्त होते त्यांची भक्ती अफाट होती.ते पैठण येथे अध्यात्मिक ज्ञान अवगत करण्यासाठी होते तेथूनच पुर्ण भगवंत प्राप्तीचे ज्ञान अवगत झाल्यानंतर परत गावी आले परंतु गावी आल्यावर माञ त्यांचे काही मन लागेना त्यातच गावालगत रोडवरून आषाढी निमीत्त दिंडी विठठल नामाचा गजर करत पंढरपुर ला निघाली होती आणि त्यांनी निश्चय केला आणि ते दिंडी त सामिल झाले.पंढरपुरात आले मंदिरात नारायण महाराज येण्या अगोदर रावळामध्ये पाच दिवसापासुन पांडुरंगा ची भक्ती करत उपाशी पोटी बसलेले महादेव महाराज व शेटीबा महाराज दिसले संत भेटी अजिमज तेणे मी झालो चतुर्भुजमहादेव महाराज व शेटीबा महाराजांना नगदनारायण महाराज ऐवजी त्यांना त्या जागी चतुर्भुज पांडुरंग दिसु लागले तेव्हा पासून पांडुरंगाच्या आज्ञेनुसार गडाची स्थापना केली व तसेच नारायण महाराज यांनी या गडावर समाजप्रबोधन करून भाविकांना भगवंत प्राप्तीची दिशा दाखवण्याची सुरूवात केली व हरिनाम गजराने नारायण गड भुमी पावन पुनित केली. व तसेच त्यांनी नारायणगडा वरून भागवत धर्माच्या प्रचाराचे कार्य केले.
महाराज हे नारदाचा अवतार होते त्यांनी अनेकांना आपल्या भक्ती ची प्रचिती दाखवलेली आहे पुढे नगदनारायण महाराजांनी मित्ती फाल्गुन वद्य एकादशी शके 1734 साली आपला देह इह लोकी ठेवून आत्मज्योत अव्यक्त परब्रह्मात विलीन झाले.तसेच त्यांच्या नावातच नगद आहे आजही जो भाविक नगदनारायण महाराज यांची मनोभावे भक्ती व सेवा करिल त्याला आजही नगद प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे संपुर्ण मराठवाड्यातील तसेच परराज्यातील भाविकांची नारायण महाराज यांच्या वर फार मोठी श्रध्दा व भक्ती आहे.
गडावर आद्य संस्थापक स्वानंद सुखनिवासी सचिदानंद स्वरूप संत नगदनारायण महाराज यांची समाधी आहे.पुढे महाराजांच्या नंतर ज्यांनी 19 वर्ष महाराजांची सेवा करून नारायण महाराज यांचे शिष्य म्हणुन महादेव महाराज यांनी नारायण महाराज यांचे कार्य सुरू ठेवले व गादीवर बसण्याचा सन्मान मिळवला त्यांच्यानंतर संत शेटीबा (दादासाहेब) महाराज, संत गोविंद महाराज, संत नरसु महाराज, संत महादेव महाराज (दुसरे), यांच्या नंतर धाकटे बंधु संत माणिक महाराज यांच्या काळात गडाचे चोहीबाजुचे बांधकाम तसेच दगडी माढी आतील वाडा असे हेमाडपंथी पध्दतीने मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.दरवाजा वगळता इतर कोठेही लाकडाचा वापर केलेला नाही असे भव्य काम करून लोकांपुढे एक आदर्श डोळयासमोर ठेवला आहे व त्यामुळे आजही साडे चारशे वर्षानंतरही हा गड तेवढ्याच ताकदीनिशी उभा आहे.
माणिक महाराज यांचा स्वभाव शांत होता त्या मुळे त्यांचा लौकीक व नारायण गडाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम त्यांनी अभुत पुर्व केले त्यांच्या नंतर परमपुज्य महंत वै.संत महादेव महाराज एक महान विभुती व सर्वांना सारखीच समान वागणूक देणारे होते.शेतमजुरापासुन ते मंञ्यापर्यत समान पाहणारे ते एकमेव महाराज होते व त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षापासून गडाची धुरा निस्वार्थ आणि श्रध्देने संभाळत होते. महाराजांनी गडाच्याभवितव्यासाठी अनेक कामे केली व 2011 साली आपला देह इही लोकी ठेवून आत्मज्योत अव्यक्त परब्रह्मात विलीन झाले. त्यांच्या नंतर नारायण गडाची मनोभावे सेवा करणारे व दरमहा एकादशी निमीत्त मादळमोही ते नारायण गड अशी पायी दिंडी घेऊनी नगदनारायण महाराज यांच्या दर्शनासाठी पायी येणारे व महादेव महाराज यांचे शिष्य महंत हभप श्री शिवाजी महाराज यांना गादीवर विराजमान होण्याचा मान मिळाला व गडाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली व ते सध्या गडाचे मठाधिपदी म्हणुन नारायण गडाची मनोभावे सेवाकार्य करत आहेत त्यांच्या कार्य काळामध्ये सध्या गडाच्या अनेक भाविकांसाठी सुविधा सोयीचे बांधकाम याठिकाणी झालेले आपणांस पाहावयास मिळते आहे यामध्ये गडाची दुसर्या मजल्याचे दर्शन रांगेचे काम, सांस्कृतिक संभामंडप, गडाच्या सुशोभिकरणाचे काम नविन अतिथी व संत महंत यांना बसण्यासाठी प्रशस्त हाॅल, व अदि भाविकांच्या सुखसोयी या ठिकाणी सध्या पहावयास मिळत आहेत महाराज यांच्या सध्या च्या कार्यकाळात गडाच्या वैभवात भर पडली आहे तसेच दरवर्षी आषाढी एकादशी निमीत्त नारायण गड या ठिकाणी लाखो भाविकांची येथे मांदीयाळी असते.असा हा श्री क्षेत्र नगदनारायण महाराजांचा महिमा अपरमपार आहे .चला तर मग या आषाढी ला नारायण गड ला विठठलाच्या व नगदनारायण महाराजाच्या दर्शनाला जय हरि ..!
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...