April 19, 2025

केंब्रिज स्कूल व ज्युनियर कॉलेजचे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

केंब्रिज स्कूल, कॉलेज मुळे विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फायदा होणार – छत्रपती संभाजी राजे

                 
गेवराई दि २७ ( वार्ताहार ) शहरातील द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, कॉलेजचा उद्घाटन सोहळा दिनांक 27 जून रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पार पडला यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.गेवराई शहरात नव्याने नावारूपाला आलेली द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व कॉलेज चा उद्घाटन सोहळा दिनांक 27 जून रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पार पडला. गेवराई सारख्या शहरात डाॅ. बी. आर. मोटे यांनी धाडस करून एक मोठे शैक्षणिक संकुल उभे केले ते खरोखरच कौतुकास्पद असून या शाळा व काॅलेज मुळे विद्यार्थ्यांची निश्चितच प्रगती होईल आणि डॉक्टर बी आर मोटे यांच्या मी सदैव पाठीशी राहील असे खा.संभाजीराजे भोसले यांनी उदघाटन प्रसंगी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी मंचावर माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार राजेंद्र जगताप, किशोर शितोळे, संतोष भंडारी, जि.प. सदस्य बप्पासाहेब तळेकर, बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पेनगुरुवार, रोहित पंडित, पूजा मोरे, ऋषिकेश बेद्रे, राजेंद्र मोटे, किशोर कांडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता देण्याचा प्रयत्न शैक्षणिक संस्था करेल व शेतकऱ्यांसाठी सदैव शिक्षणासाठी मदत राहील असे प्रतिपादन डॉक्टर बी आर मोटे यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी शाळेचे संचालक डि. डि. गवारे, शेख जमादार, डॉ. वर्षा मोटे, विशाल चौरे, वैभव गवारे, मुरलीधर जाधव, प्रवीण खरात, शाळेचे शिक्षक सुशिल टकले, सचिन अभंग, महेश ढेरे यांच्यासह पत्रकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सारीका नारायण यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आबेद जमादार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *