आज पासून कृषी संजीवनी सप्ताह;शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – तालुका कृषी अधिकारी वडकुते
गेवराई : दि २५ ( वार्ताहार ) कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांच्या वतीने गेवराई तालुक्यात दिनांक २५ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. श्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दरवर्षी एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो, राज्यातील शेतकरी समृद्ध आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावा अशी स्वप्न त्यांनी पाहिले होते या थोर नेत्याची आठवण म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत दिनांक २५ जून ते १ जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा तालुका कृषी कार्यालयामार्फत गाव निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. कृषी संजीवनी सप्ताहात कृषी विभागातील अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी सेवक, कृषी मित्र यांच्या मार्गदर्शनाखाली गावात बैठक घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या कृषी संजीवनी मोहिमेचा फायदा घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...