विजयसिंह पंडितांच्या हस्ते गौंडगावात ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
गौंडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शाखेची स्थापना
गेवराई दि.२४ (वार्ताहार) माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गौंडगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेची स्थापना माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, चेअरमन नारायण नवले, जयभवानी कारखान्याचे संचालक भास्कर खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गौंडगाव येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत ७७ लक्ष रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा कामाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये विहीर, पाईप लाईन, जलकुंभ आदी कामांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेची स्थापना विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करुन शाखेची कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी अशोक सोलाट, उपाध्यक्षपदी पांडुरंग बनसोडे, सचिवपदी झुंबर सोनवणे तर सदस्य म्हणून महादेव बनसोडे, पोपट प्रधान, महादेव सोनवणे, छगन सोनवणे, लहुराव सोलाट, नामदेव बनसोडे, ईश्वर बनसोडे, गणेश इनकार, दाऊद शेख, विनोद शिंदे, शरद पुरी, रशीद शेख, शरद सोलाट यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...