एकनाथ शिंदे यांना काय ?दिली भाजपाने ऑफर; काय ?म्हणाले प्रकाश आंबेडकर

मुंबई दि २३ ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपासुन शिवसेना नेते यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार यांना सोबत घेऊन पक्षा विरोधात व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड फुकारला आहे गेल्या दोन दिवसांपासुन ते गूहाठीमध्ये जाऊन बसले आहेत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह येऊन आपली भूमिका स्पष्ट केली व वर्षा निवस्थानावरून ते आपल्या मातोश्रीवर गेले आहेत परंतू बंडखोर एकनाथ शिंदे यांना भाजपाने काय ? ऑफर दिली यांची कुणालाच कल्पना नव्हती या सत्तासंघर्षात आत्ता वंचित आघाडीने उडी घेतली आहे या बाबद प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट वरूण खुलासा केला आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , महाविकास आघाडी च्या कार्यक्षमतेवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सगळेच आमदार नाराज असल्याची खंत व्यक्त केली तसेच प्रत्येक खात्यात मुख्यमंत्री यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप करतात तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याच आमदार यांना वेळ देत नाहीत तसेच सगळा फायदा मित्रपक्षाला होतो त्यामुळं स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासोबत आम्ही तडजोड करणार नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा बरोबर युती करुण नव्या सरकारमध्ये यावं अशी मागणी बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मांडली आहे .

त्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हवर जनतेशी संवाद साधला मला पदाची लालसा नाही एकही आमदार माझ्या समोर येऊन म्हणाला की तुम्ही मुख्यमंत्री नकोत तर मी एका क्षणांत राजीनामा देईल . तसेच मित्र पक्षातील खा शरद पवार असतील कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी असतील यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याला मी तडा जाऊ दिला नाही म्हणत त्यांनी जनतेशी संवाद साधला त्यानंत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आत्तापर्यंत आपली भूमिका जाहिर केलेली नाही तसेच भाजपाने एकनाथ शिंदे यांना कोणती ऑफर दिली आहे याचा खुलासा वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपात येऊन सरकार स्थापन करावं अशी अट भाजपाने एकनाथ शिंदे यांना घातली असल्याचा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करूण केला आहे असल्याने आणखी याविषयी पेच निर्माण झाला असुन एकनाथ शिंदे काय ? भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *