गेवराई दि २१ ( वार्ताहार ) गंगावाडी या ठिकाणी वाळू घाटावर नियमाची पायमल्ली होत आहे तसेच दुसऱ्याच गटातून वाळू उपसा होत असल्याने या ठिकाणी स्थानिक आमदार व ग्रामस्थ यांनी जलआंदोलन केले होते तसेच स्वत; जिल्हाधकारी यांनी या प्रकरणी ठेका बंद केला जाईल असे सांगितले होते परंतू या प्रकरणी त्री सदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली होती या समितेने देखील या संदर्भात अहवाल सादर केल्यानंतर बनावट ठराव घेतल्या प्रकरणी गंवाडीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत तसेच गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे .