खांडवीच्या अहिल्याबाई होळकर विद्यालयाचा परीक्षेत शंभर टक्के निकाल

गेवराई दि २० ( वार्ताहार ) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी घोषित केलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये गेवराई तालुक्यातील शोभा देवी महिला सेवाभावी संस्था संचलित अहिल्याबाई होळकर विद्यालय खांडवी या विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.शाळेतून गुणानुक्रमे भोजने आकाश रामदास (94), शेजुळ कोमल तुळशीराम (93.60), रविराज दत्तात्रय शिंदे(88.40), प्रियंका अंकुश राठोड(88.40) टक्के घेऊन गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय,आणि तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.

     

      विशेष प्रावीण्यासह -16 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत -3 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, शाळेचा निकाल 100% लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी सभापती युधाजित पंडित, संस्थेच्या अध्यक्षा गिरीकाभाभी पंडित, सचिव सौ अनुरुपाताई पंडित, युवानेते यशराज पंडित, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद देसले, शाळेचे मुख्याध्यापक केशव तळेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक बाबासाहेब ढाकणे, मनोज मोरे, अविनाश शेजुळ, दत्तात्रेय सकुंडे, मोहन हिंगे, रामचंद्र गरुड, अर्जुन धुमाळ, किसन बांगर, रामदास भोजने आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *