सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांसह शालांत परीक्षेतही
गेवराईच्या सेंट झेवियर्स हायस्कूलने मारली बाजी

गेवराई दि १८ ( वार्ताहार  ) गेवराई तालुक्यातील विविध स्पर्धात्मक परीक्षण सह सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूल नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डच्या परीक्षेतही घवघवीत यश संपादन करून बाजी मारली आहे यावर्षीही शाळेचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात येथील सेंट झेवियर्स स्कूलचे 113 पैकी 113 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे यात 91 ते 100 टक्क्यांमध्ये 45 विद्यार्थी, 81 ते 90 टक्के यांमध्ये 55 विद्यार्थी, 71 ते 80 टक्के मध्ये 12 विद्यार्थी तर 61 ते 70 टक्के यांमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. गुणानुक्रमे शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान अक्षित भानुदास काशीद याने पटकावला असून, दुतिय क्रमांक अजिंक्य दिगंबर ढाकणे, प्रशांत श्रीराम आटपाळे तर तृतीय क्रमांक आदित्य कल्याण वाघमारे याने पटकावला आहे. पहिल्यांदाच शाळेतून मुलींना बाजूला सारून मुलांनी बाजी मारली आहे. दिनांक 18 जून 2022 रोजी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य फादर पीटर खंडागळे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष, पत्रकार दिनकर शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल भालेकर, पर्यवेक्षक दीपक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दिनकर शिंदे म्हणाले की, सेंट झेवियर्स स्कूलने आपला एक वेगळा शैक्षणिक पॅटर्न निर्माण केला असून, यशस्वी विद्यार्थ्यांमुळे शाळेचे तालुक्यात कौतुक होत आहे. मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या सेंट झेवियर्स मध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षा सोबतच, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेतही विद्यार्थी नाव कमवत असताना शालांत परीक्षेतही घवघवीत यश संपादन करून विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. शाळेने घालून दिलेली शिस्त विद्यार्थ्यांनी पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे सचिव फादर प्रकाश भालेराव आणि शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस साळवे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य फादर पीटर खंडागळे यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाले.  शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *