पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरावर हल्ला प्रकरणी;श्याम आडागळे सह तिघां विरोधात गुन्हा

गेवराई दि १७ ( वार्ताहार ) सिरसदेवी येथील स्थानिक पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरावर गावांतील गावगूंड यांनी हल्ला चढवला व या हल्यात त्यांची चुलती गंभीर जखमी झाली आहे तसेच त्यांच्या दोन पुतणे यांना देखील मारहान या गावंगूडांनी केली असल्याची घटना सिरसदेवी या ठिकाणी घडली या प्रकरणी तलवाडा पोलिसांत श्याम आडागळे सह तिन जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , सिरसदेवी येथील स्थानिक पत्रकार यांचे सेतू कार्यलय आहे त्याठिकाणी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या श्याम आडागळे यांने धिंगाना घातला पत्रकार सचिन वक्ते यांना शिवीगाळ केली ऐवढ्यावरच न थांबता त्यांच्या दोन पुतणे यांना मारहान करूण त्यांच्या हातावर व पायावर कटरने वार केले आहेत सदर घटनेची तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांना पाठवले त्यानंतर श्याम आडागळे व यांच्यासह तिन लोकांनी मिळून पत्रकार सचिन वक्ते यांच्या घरी जाऊन त्यांच्या चुलतीला मारहान केली व त्यांच्या गळ्यातील दागिने , व विस हजार रूपये गळ्याला चाकू लावून घेतले व त्यांचा विनयभंग केला असल्याची तक्रार त्यांनी तलवाडा पोलिसांत दिली असुन त्यांच्या फियार्दीवरूण श्याम नागूराव आडागळे सह तिन लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तलवाडा पोलिस करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *