क्राईम

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

Spread the love

चुलत बहिणीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 10 वर्षांची शिक्षा

बीड दि 30 ( वार्ताहार ) : चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गेवराई येथील आरोपी राहुल सुरेश राका यास न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच 5 हजार रुपयांचा दंड, आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या बाबद सविस्तर  माहिती अशी की,ही शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी सुनावली. संबंधित घटना एप्रिल 2017 मधील असून, पीडितेच्या तक्रारीनंतर गेवराई पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले. तसेच घटनेच्या दिवशी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाली.या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांचे पुरावे आणि सरकारी विधिज्ञ अजय श्रीमंतराव तांदळे यांच्या युक्तिवादावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
या खटल्यात विधिज्ञ. शशिकांत सावंत यांनी सहकार्य केले, तर जिल्हा सरकारी विधिज्ञ अजय राख यांनी मार्गदर्शन केले. तपास अधिकारी के. के. बोरडे तसेच महिला पोलीस कर्मचारी सविता चव्हाण आणि श्रीकांत पाखरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page