शिक्षक भारती संघटनेच्या मागणीला यश

बंद पडलेल्या दिव्यांगाच्या शाळेतील कर्मचाऱ्यांचा समायोजनाचा मार्ग मोकळा

                  गेवराई दि १५ ( वार्ताहार ) 
राज्यातील आयुक्तालय स्तरावरुन बंद केलेल्या दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन करा अशी मागणी सातत्याने मंत्री महोदय तसेच दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने होत होती संघटनेच्या पाठपुराव्यामुळे अखेर त्या मागणीला यश आले असून दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्तरावर राज्यातील बंद पडलेल्या दिव्यांगाच्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मा.आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश कायम ठेवण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे शिक्षक भारती विशेष शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कर्मचारी बांधवांनी आभार व्यक्त केले. राज्यातील आयुक्तालय स्तरावरुन बंद करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे अशी मागणी मा.मंत्री महोदय, दिव्यांग कल्याण आयुक्त यांना करण्यात आली होती. सदरील दिव्यांग शाळा बंद होऊन चार वर्षाचा कालावधी लोटला असून सदरील बंद केलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. अखेर शिक्षक भारती संघटनेच्या मागणीला यश आले असून दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचा समायोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडून बंद करण्यात आलेल्या दिव्यांग शाळेचे आदेश शासन स्तरावरुन कायम करण्यात आलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांनी आपले समायोजन करण्याकरिता आयुक्तालय स्तरावर पाठपुरावा करून आपले कागदपत्रे सादर करुन समायोजन करून घ्यावे. समायोजन प्रक्रिया दरम्यान काही अडचणी आल्यास संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष लहूराव ढोबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *