January 22, 2025

नुतन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर फिल्डवर

पोलीस ठाण्यांना अचानक भेटी

बीड दि ११ ( वार्ताहार )  जिल्ह्याचे सुत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या ४८ तासात नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज लागलीच  नेकनूर, केज, युसूफवडगांव, धारूर, अंबाजोगाई, परळी, बर्दापूर पोलीस ठाण्यांना अचानक भेटी देत तेथील कामकाजाची पाहणी करत यंत्रणेला काही महत्वाच्या सुचना दिल्या. सामाजिक ऐकोपा टिकवण्याबाबत गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे, अवैध धंदे शंभर टक्के बंद असणे याला महत्व देण्याचे सांगितले.गेल्या दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेणारे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज भल्या सकाळीच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या आहेत .

भेट देण्यासाठी बाहेर पडणे पसंत केले. सर्वात सुरुवातीला नेकनूर पोलीस ठाण्यात भेट देवून तेथील कामाची पाहणी करत पोलीस या अडीअडचणीसह परिसराची माहिती घेतली. पुढे ते केज, धारूर, युसूफवडगांव, अंबाजोगाई, बर्दापूर, परळी पोलीस ठाण्याना भेटी देणार आहे. याबाबत  थेट नंदकुमार ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या भेटीत पोलीस स्टेशनच्या कामकामाजासह जिल्ह्याची माहिती घेत आहे. जिल्ह्याची भौगोलीक, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्वाचे आहे असं म्हणत नूतन पोलीस अधिक्षकांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून काम करण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *