April 19, 2025

गंगावाडी वाळू घाट प्रकरणी;समितीचा अहवाल सादर

आज जिल्हाधिकारी निर्णय? घेण्याची शक्यता 

गेवराई दि १० ( वार्ताहार ) गंगावाडी येथिल ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनीधी यांनी जलआंदोलन केले होते या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी वाळू घाट रद्द करण्यात येईल असे अश्वासन ग्रामस्थ व लोकप्रतिनीधी स्थानिक आमदार यांना दिल्यानंतर या प्रकरणात त्री सदस्यीय समिती ची नेमणूक करूण अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापुर्वी दिले होते तसेच या समितीच्या वतिने जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे तसेच गंगावाडी वाळू घाटा बाबत आज निर्णय होईल अशी अपेक्षा आहे .

     या बाबत सविस्तर माहिती अशी की , गंगावाडी या ठिकाणी सुरू असलेला वाळू घाट वनावट कागदपत्राअधारे करण्यात आला आहे तसेच वाळू घाट वेगळ्या गटात असुन दूसऱ्याच ठिकाणावरून वाळू उपसा केला जातो तसेच सर्रास नियमाची पायमल्ली केली जाते म्हणून गावातील नागरिकांनी स्थानिक आमदार यांना सोबत घेऊन ( दि ४ जून ) रोजी गोदापात्रात जल आंदोलन करण्यात आले या ठिकाणी सुरू असलेल्या जलआंदोलनाला जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी भेट देऊन वाळू घाट बंद केला जाईल असे अश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले तसेच जिल्हाधिकारी यांना या प्रकरणी अर्धा गांवातील नागरिक यांनी भेटून निवेदन सादर केले व वाळू घाट नियमातच आहे तो सुरूच ठेवावा अश्या मागणीचे निवेदन सादर केले तसेच वाळू ठेकदार यांनी देखील जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात सरपंच व ईतर दोन लोकांनी २०  लाखांची मागणी केल्याचा आरोप या तक्रारीत केला असल्याने प्रशासनाची या प्रकरणात डोकेदूखी वाढली आहे या प्रकरणी बीडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीराम भेंडे , बीड चे तहसिलदार सुहास हजारे , गेवराईचे गटविकास अधिकारी डॉ सचिन सानप अशी त्री सदस्यीय समिती या प्रकरणात गठीत केली होती व  समितीने गंगावाडी वाळू घाटावर जाऊन पाहणी करून त्यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे तसेच हा वाळू घाट बंद होतो किंवा पोलिस संरक्षणात पुन्हा सरू होणार का ? या बाबद आज जिल्हाधिकारी निर्णय घेतील अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *