अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी महिलेची आत्महत्या
बीड:दि ८ ( वार्ताहार ) तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेने पाली येथील तलावात आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. सीमा सुरेश डोंगरे हे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी पहाटे सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी पाली येथील तलावात सिमा डोंगरे या महिलेचे शव आढळले. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती.