गेवराई दि ४ ( वार्ताहार ) गेल्या चार तासांपासुन गंगावाडी येथील ग्रामस्थ व आ लक्ष्मण पवार गोदापात्रात ठाण मांडून बसले आहे स्थानिक तहसिलदार यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतू गांवकरी व आमदार मोहदय आंदोलनावर ठाम आहेत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आंदोलक गांवकरी यांना फोनवर संपर्क केला परंतू आंदोलक ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाम आहेत तसेच आंदोलक यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या गंगावाडी येथिल घटनास्तळावर येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतिने देण्यात आली आहे तसेच ह्या वाळू ठेक्याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे यामध्ये बीड उपविभागीय अधिकारी , तहसिलदार बीड , गटविकास अधिकारी गेवराई यांचा समावेश आहे .