अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त
मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

गरजुंनी लाभ घेण्याचे जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाने केले आवाहन


गेवराई, दि.30 ( वार्ताहार )  माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडून मंगळवार, दि.31 मे रोजी सकाळी 10 वाजता कृष्णाई येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र तपासणी करून निवडलेल्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि.31 मे रोजी सकाळी 10 वाजता कृष्णाई येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दुपारी 12 वाजता कृष्णाई येथे अवयव दान संकल्प मोहिमेचा शुभारंभ, दुपारी 2 वाजता मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधी आ.सतिष चव्हाण यांच्या उपस्थितीत र.भ.अट्टल महाविद्यालय येथे कोविड योद्धा यांचा सन्मान, दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते कृष्णाई येथे होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वितरण शुभारंभ होणार असून दि.1 जून रोजी डॉ.सर्वोत्तम शिंदे यांच्या माध्यमातून सकाळी 11 ते 3 या वेळेत श्री साई सोनोग्राफी व स्कीन केअर सेंटर येथे त्वचारोग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे.

माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु केलेली असून मोबाईल क्र. 9049887750 आणि 8080063241 या क्रमांकावर संपर्क करून आपली नोंदणी करण्याचे आवाहन जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *