राज्यभरात मे महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. त्याची विविध विभागात लगबग सुरु असतानाच आता जून अखेरपर्यंत कोणत्याच बदल्या करू नयेत असे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लागला असुन अनेक अधिकारी कर्मचारी यांची हिरामोड झाली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की ,जिल्ह्यातील सर्वच विभागात सध्या बदल्यांच्या हालचाली सुरु आहेत. पोलीस, ग्रामविकास विभागात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत, तर महसूल विभागात येत्या दोन दिवसात बदल्या होणार होत्या. दुसरीकडे सर्वच विभागातील अधिकारी बदली आदेशाची वाट पाहत आहेत. अपेक्षित बदलीसाठी अनेकांनी फिल्डिंग ‘ देखील लावलेली होती . मात्र शुक्रवारी अचानक राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व बदल्यांना एक महिन्यासाठी ब्रेक लावला आहे. जून अखेरपर्यंत कोणाचीही बदली करू नये असे आदेश काढण्यात आले असून, प्रशासकीय बाब म्हणून एखादी बदली आवश्यक असेलच तर त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार आहे. या आदेशाने महसुल सह अन्य विभागातील अधिकारी , कर्मचारी यांची हिरामोड झाली आहे
बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करून देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला - अमित गोरखे अनुसूचित जातीतील संशोधन करणाऱ्या 861 विद्यार्थ्यांना...
पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन...
मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क...