गेवराई दि २४ ( वार्ताहार ) बेलगांव परिसरात आपले कर्तव्य बजावत असतांना लाईट तोडली यांचा राग मनात धरून एकाने लाईनमनला मारहान केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शासकीय कामात अडथळा व अन्यकलान्वे गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , बबन राजू कोळेकर ( वय ३५ वर्ष ) राहनार गोपाळवस्ती बेलगांव असे आरोपीचे नाव असुन ( दि २३ मे ) रोजी बेलगांव परिसरातील डिपी दूरूस्त करण्यासाठी दोन लाईमन त्याठिकाणी गेले होते तसेच वरिल आरोपीने तुम्ही माझे कनेक्शन कट करू नका असे म्हणत विज वितरण कंपनीचे कर्मचारी यांच्याशी हूज्जत घालून त्यांना लाथा बूक्यांनी मारहान केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद अभिमन्यू श्यामराव राठोड ( वय ३२ वर्ष ) यांनी गेवराई पोलिसांत दिली असुन या प्रकरणी वरिल आरोपी विरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व अन्यकलान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोडके करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...