गेवराई दि ११ ( वार्ताहार ) तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्यांने आपल्या ऊसाच्या फडाला आग लावून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्यांची घटना उघडकीस आल्यानंतर तातडिने याठिकाणी जिल्हाधिकारी राजाबिनोद शर्मा यांनी पिडीत परिवारांची भेट घेतली .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , नामदेव आसाराम जाधव ( वय ३२ वर्ष ) या शेतकऱ्यांने आपला ऊस जात नसल्या कारणाने नैराशातून ऊसांच्या फडाला आग लावली व त्यानंतर त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपवली तसेच हा शेतकरी अल्पभूधारक होता याला दिड एकर जमिन होती तसेच एक एकरांत ऊसांची लागवड करण्यात आली होती मात्र ऊस कारखाना नेत नव्हता व तो वाळून चाललेला होता याच नैराशातून वरिल शेतकरी यांने आत्महत्या केली आहे तसेच या शेतकऱ्यांवर बँकेचे देखील कर्ज होते घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हिंगणगाव या ठिकाणी जाऊन पिडीत परिवारांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच सर्व शासकीय योजनाचा लाभ पिडीत परिवाराला मिळवून देण्याचे अश्वासन दिले तसेच त्यांच्या समवेत गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे , मंडळ अधिकारी बाळासाहेब पखाले , बाळासाहेब मस्के ,तलाठी विठ्ठल आम्लेकर ,यांच्यासह पोलिस आणि महसुलचे कर्मचारी उपस्थित होते .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...