April 19, 2025

उपजिल्हा रुग्णालयात रजा देऊन डॉक्टर खाजगी दवाखाना चालवू लागले

गेवराईच्या बालरोग तज्ञांचा प्रताप

गेवराई दि ११ ( वार्ताहार ) उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यास असनाऱ्या एका बालरोग तज्ञ यांनी गेल्या काही दिवसांपासुन उपजिल्हा रुग्णालयात दांडी मारल्याचा प्रकार समोर आला तसेच या डॉक्टर यांनी रजा दिली आहे मात्र ती रजा वैधकीय अधीक्षक यांनी मंजूर केली नाही .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , उपजिल्हा रुग्णालयात डॉ मोमिन अब्दूल रोफ हे कार्यरत आहेत त्यांनी ( दि ६ मे ते १२ मे ) पर्यंत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे वैधकीय रजा मिळावी या साठी अर्ज केला आहे त्यामध्ये त्यांनी वैधकीय प्रमाणपत्र ही जोडले आहे त्यांच्या छातीमध्ये दूखू; लागल्याने ते रजेवर गेले आहेत मात्र वास्तविक पाहता ते त्यांच्या खाजगी दवाखाना या ठिकाणी ते रुग्ण तपासणी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मात्र उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्या कारणाने रूग्णांची गैरसोय झाली तसेच दांडी बहादर डॉक्टर यांच्याविरूद्ध कार्यवाई अपेक्षीत आहे .

उपजिल्हा रुग्णायलयात मोठ्या प्रमाणात लहान बालके हे उपचार करण्यासाठी येतात परंतू या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध होत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखाण्यात मोठी किमंत मोजावी लागत आहे परंतू मध्यम वर्गीय तसेच गरीब रूग्ण यांना खाजगी खर्च परवडत नाही मात्र उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असतांना वैधकीय रजा देऊन सवत: चा दवाखाना चालवनाऱ्या डॉक्टरवर काय ? करणार असे वैधकीय अधीक्षक यांना विचारना केली असता त्यांची रजा मंजूर केलेली नाही तसेच त्यांच्यावर योग्य ती कार्यवाई करण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती वैधकीय अधीक्षक यांनी दिली असुन डॉ मोमिन अब्दूल रोफ यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *