अट्टल महाविद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना  अभिवादन

गेवराई, दि. ६, ( वार्ताहार ) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयात राजर्षी शाहू  यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून या कृतज्ञता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनुने, दिनविशेष समितीचे डॉ. रेवणनाथ काळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील भगत, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संदीप वंजारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी राहुल माने, डॉ. वृषाली गव्हाणे, डॉ. सुदर्शना बढे, डॉ. अमोल शिरसाट यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *