April 19, 2025

गोदापात्रात पोकलेन , जेसीबी , केन्या , चालनार नाहीत – पंकज कुमावत

नियम मोडला तर कार्यवाई करणारच सहा पोलिस अधीक्षक यांची वाळू घाट खरेदीदार यांना तंबी

गेवराई दि ३ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात सात ठिकाणी वाळू घाट सुरू करण्यात आले आहेत यामध्ये अनेक ठिकाणच्या वाळू घाटावर नियमाची पायमल्ली केली असल्याची बाब निर्दशनास आली आहे अनेक ठिकाणच्या वाळू घाटावर केनी , जेसीबी , पोकलेन , चा वापर केला जातो तो बेकायदेशीरच आहे नियम मोडला तर कार्यवाई करणार असल्याचे सहा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सांगितले आहे .

बीड जिल्हातील वाळू ठेकेदार यांची बैठक आज ( दि ३ जून ) रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान तहसिल कार्यलय गेवराई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसिलदार सचिन खाडे , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , उप प्रादेशिक अधीकारी गणेश विघ्ने , यांची उपस्थिती होती वाळू घाटावर चाललेली पायमल्ली तसेच नियमाचे उल्लघन होत असल्यामुळे ही बैठक आयोजित केलेली होती तसेच वाळू घाटाच्या दोनशे मिटर परिसरात आता स्टॉक करावा तसेच वाहतूक कर्मशियल ट्रॅक्टरने वाळू साठा करावा तसेच लेबरने हायवा गाडी भरावी पोकलेन , जेसीबी , केनी , याचा वापर करू नये तशी परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडून घ्यावी प्रत्येक हायवा गाडीवर सुपष्ट नंबर प्लेट असावी सदरच्या हायवाचे वाळूचे वजन ३५ टनापेक्षा जास्त नसावे १५० किलोमिटरच्या आत ईनव्हाईस असावा वाळू घाट सकाळी ७ ते सायं सात वाजेपर्यंतच चालू राहतील प्रत्येक हायवाला जिपीएस असने आवश्यक वाळू घाटाची पावती हायवा चालकांकडेच असावी जर त्याच्याकडे पावती न मिळाली तर त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल .वाळू घाटावर सिसिटिव्ही बसवने बंधनकारक , सिसिटिव्हीची सिडी प्रत्येक आठवड्याला तहसिल कार्यलयात जमा करावा किमान ४ ब्रास वाळू हायवात भरावी अश्या नियमावली याचा पाढा त्यांनी वाळू ठेकेदार यांना वाचून दाखवला व सगळ्यांनी नियमाचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले या बैठकीत बीड जिल्ह्यातील वाळू ठेकेदार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *