April 19, 2025

रोखठोक पत्रकार दिनकर शिंदे यांना अप्रतिम मीडियाचा चौथास्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पुणे दि ३( वार्ताहार ) ‘अप्रतिम मीडिया’च्या वतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार – 2022 ‘ साठी संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींमधून बीड जिल्ह्यातील रोखठोक लिखाण करणारे दैनिक पार्श्वभूमीचे ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

     पत्रकार दिनकर शिंदे हे बीड जिल्ह्यातील दैनिक पार्श्वभूमी मध्ये गेल्या 23 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात विविध विषयांवर समाज हितासाठी आणि जनजागृतीसाठी रोखठोक आणि बॉटमलाईन या सदरामधून लिखाण करतात. त्यांनी केलेल्या आजवरच्या लिखाणाची दखल घेऊन विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातच अप्रतिम मीडियाच्या वतीने राज्यातील विविध माध्यम प्रकारच्या प्रतिनिधींची चौथास्तंभ विशेष पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केल्या जाते. संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी आदी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ अनिल फळे, संचालिका सौ प्रीतम फळे, निमंत्रक राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली. यावर्षी जाहीर झालेल्या राज्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांमध्ये बीड जिल्ह्यातील दैनिक पार्श्वभूमी चे ज्येष्ठ पत्रकार दिनकर शिंदे यांची “चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारा” साठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार लवकरच मुंबई येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून, दिनकर शिंदे यांना देण्यात येणार असल्याचे अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ अनिल फळे यांनी कळवले आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये दिनकर शिंदे (बीड पार्श्वभूमी ) यांच्यासह प्रकाश कथले (वर्धा), हेमंत जोशी (मुंबई ), योगेश त्रिवेदी (मुंबई) आशुतोष पाटील (संपादक न्यूज 18 लोकमत), मदन काळे (पुणे ), प्रशांत सिनकर (ठाणे महाराष्ट्र टाइम्स), महेश जोशी ( औरंगाबाद दिव्यमराठी) अरुण पवार (किनवट), श्याम कुमार पुरे (सिल्लोड), राजेंद्र भोसले (कन्नड), शाश्वत गुप्ता (गोवा), विलास ओव्हाळ (पणजी), मकरंद जाधव (रायगड), नितीन मोरे (नांदेड) आदींसह राज्यातील पत्रकार यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *