April 19, 2025

आधार फाउंडेशन व डॉक्टर असोसिएशनच्या वतिने विद्यार्थ्यांना पाच लाखांची शिष्यवृत्ती

दहा मे रोजी होणार ऑनलाईन पद्धतीने परीक्षा         

                 गेवराई: दि ३० ( वार्ताहार ) 
आधार फाउंडेशन व डॉक्टर असोसिएशन गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई तालुक्यातील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच लाखांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याची सुरुवात या वर्षापासून करण्यात येत आहे व त्यासाठी 10 मे रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा फायदा घ्यायचा आहे. त्यांनी पाच मे पर्यंत 9503072903 या व्हाट्सअप नंबर वरती आपले नाव, नंबर व आधार कार्ड पाठवावे व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आधार फाउंडेशनचे चेअरमन डॉ. बी. आर. मोटे व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सर्वोत्तम शिंदे यांनी केले आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, आधार फाऊंडेशन व डॉक्टर असोसिएशन हे नेहमीच तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टीने फायद्याचे काम करत असतात शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग असतो. यावेळी ज्या विद्यार्थ्यांच डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं स्वप्न आहे परंतु परिस्थिती अभावी अडचण येत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून पाच लाखांच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. गेवराई तालुक्यातील ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली व जे अकरावी बारावीला शिकत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी 10 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दहावी परीक्षा दिलेल्या व अकरावी-बारावीला सायन्सला शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पाच मे पर्यंत 9503072903 या व्हाट्सअँप क्रमांक वर आपले नाव, संपर्क क्रमांक व आधार कार्ड पाठवावे व याच नंबर वर संपर्क साधून आपला परीक्षेसाठी प्रवेश निश्चित करून घ्यावा व जे विद्यार्थी या परीक्षेत चांगले गुण घेतली त्या 20 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. असा एकूण पाच लाखापर्यंत शिष्यवृत्तीचा फायदा मिळणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा घ्यायचा आहे. त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे असे आवाहन आधार फाउंडेशन चे चेअरमन डॉ. बी. आर. मोटे व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सर्वोत्तम शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *