January 22, 2025

संविधानाने दिलेले आरक्षण रद्द करून बहुजन युवकांना बेरोजगार करण्याचे संघाचे षडयंत्र

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संविधानाचे रक्षण करण्याचा निर्धार करा

ॲड भगवान कांडेकर यांचे युवकांना अवाहन 

बीड दि ३० ( वार्ताहार ) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने सर्वस्वाचा त्याग करून बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगती साठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली परंतु बहुजन समाजाचे आरक्षण संपुष्टात आणन्याचे षडयंत्र संघाची मंडळी करीत याला वाचवण्याचा निर्धार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त करावा असे आवाहन ॲड भगवान कांडेकर यांनी केले आहे .

शिरसमार्ग येथील जयंती निमित्त ते बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मुर्ती ने गुलाम केलेल्या बहुजन समाजाला घटनेच्या माध्यमातून नोकरीतील आरक्षण मिळवून दिले शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला या मुळे अनेक लोक सरकारी नोकरीत लागले अनेक इंजिनियिंर झाले डॉक्टर झाले कलेक्टर तहसिलदार झाले अनेक लोक सरकारी अधिकारी झाले या मुळे बहुजन समाजाची प्रगती होत गेली व ते सर्व बहुजन समाजाची जनता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन चळवळ गतिमान करून बहुजन समाज संघटित करू लागली या मनुवादी व्यवस्था नष्ट होईल की काय याची भीती संघाला वाटू लागली परंतु सत्ता हातात नव्हती म्हणुन ते काय करू शकत नव्हते परंतु आज सत्ता त्यांच्या हातात आली आहे त्याचा दुरुपयोग करून सरकारी उद्योगाचे खासगीकरण करून बहुजन समाजाचे आरक्षण संपुष्टात आणन्यात येत आहे व बहुजन युवकांना बेरोजगार करून त्यांना गुलाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे जर युवक बेरोजगार झाला तर तो वाइट मार्गाला लागेल व त्यांची भावी पिढी लाचार होऊन चळवळ गतिमान होणार नाहीं हे षडयंत्र मनुवादी सरकारने सुरू केले आहे.

शिक्षणाचे बाजारीकरण करून बहुजन समाज युवकांना उच्च शिक्षणा पासून वंचित ठेवले जात आहे याची जाणिव आजच्या बहुजन युवकांमध्ये नाही ते फक्त नाच गाणी म्हणन्यात व जयजयकार करण्यात गुंग आहेत म्हणून युवकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचे रक्षण करण्याचा निर्धार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ची चळवळ गतिमान करण्यासाठी संघटीत होऊन संविधानाचे रक्षण करावे असे आवाहन ॲड भगवान कांडेकर यांनी केले या प्रसंगी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *