गेवराई दि २८ ( वार्ताहार ) तालुक्यातील तळणेवाडी येथील बनावट लग्न करून दोन लाखं रुपयाला गंडा घातल्याप्रकरणी दोघांना गेवराई पोलिसांनी अटक केली होती त्यांना आज ( दि २८ एप्रिल ) रोजी गेवराई प्रथम न्यायमु्र्ती यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते या प्रकरणी तपास अधिकारी साजेद सिद्धिकी व सरकार पक्षाच्या वतिने सहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे .