बनावट लग्नातील नवरी रेखा व तिच्या आईला काल गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केल्यानंतर आज तीला व तिच्या आईला गेवराई प्रथम न्यायालयात हजर करण्यात आले होते तसेच या प्रकणाचे तपास अधिकारी साजेद सिद्धिकी यांनी सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली तसेच न्यायालयाने त्यानां सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की , रेखा बाळू चौधरी ( वय २८ वर्ष )व तिची आई संगिता बाळू चौधरी ( वय ५० वर्ष ) या दोघीनां काल ( दि २६ रोजी ) जाधववाडी औरंगाबाद या ठिकाणावरून गेवराई पोलिसांनी अटक केली होती तसेच तळणेवाडी येथील गणेश फरताळे या तरूणाला लग्न लावून त्याच्यांकडून दोन लाखं रुपये उकळले व नवरी रेखा लग्नाच्या काहीदिवसानंतर फुर्रर्र झाली होती तिचे यापुर्वी लग्न झाले असुन तिला दोन आपत्य असल्यांची धक्कादायक माहिती गणेश फरताळे यांना मिळाल्यानंतर त्याने गेवराई पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला या प्रकरणाशी निगडीत असनाऱ्या दोन आरोपी रामकिसन तापडिया राहनार शेवगांव व विठ्ठल पवार यांना दोघांनाही ताब्यात घेण्यात गेवराई पोलिसांना यश आले असुन सदर प्ररकरणात दोन लाखं रुपये वाटून घेतले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे तसेच या प्रकरणी रेखा बाळू चौधरी व तिची आई संगिता बाळू चौधरी यांना दोघीनांही काल गेवराई पोलिसांनी जाधववाडी औरंगाबाद याठिकाणावरून अटक केली आज ( दि २७ रोजी ) गेवराई पोलिसांनी गेवराई येथील प्रथम न्यायममुर्ती सौ मिना प्र एखे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांनी या दोघीनां २ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...