मनोज आव्हाडची हत्या ही मानवतेला कलंक – अजिंक्य चांदणे
कठोर शासन करण्यासाठी डीपीआय पाठपुरावा करणार
औंरगाबाद दि २५ ( वार्ताहार )
अतिषय दुर्दैवी घटना व मानवतेला कंलक असनारी घटना औंरगाबाद सारख्या ठकाणी घडणे हे अनअपेक्षीत आहे मनोज आव्हाड या तरूणाला अतिशय क्रूर पद्धतीने संपवले आहे या प्रकरणातील आरोपीना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी तसेच पिडीत परिवाराचे पुनर्वसन स्थानिक प्रशासनाने करावे तसेच यामधील गुन्ह्यात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढवावे अशी मागणी डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , औंरगाबाद हुडको परिसरात गेल्या चार दिवसांपुर्वी चोरीचा संशय घेऊन काही विघ्नसंतोषी निच मानसिसतेच्या लोकांनी कुकर्म केले त्यांची हत्या करून त्याचा व्हिडीओ सोशलमिडीया च्या साह्याने त्याच्या भावाला पाठवला तसेच त्याला मरेपर्यंत मारले त्यानंतर आरोपीनी त्याला आंघोळ घालुन अंगावरचे कपडे बदलुन त्याला घाटीत दाखल करून आरोपी पसार झाले परंतू मनोज आव्हाडच्या भावाला पाठवलेला व्हिडीओ त्यावरून सदरचे प्रकरण उडकिस आले पोलिस प्रशासनाने आरोपी देखील अटक केले या प्रकरणी एक आरोपी फरार आहे तसेच त्याला लवकर अटक करू असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले असुन मनोज आव्हाड या तरूणांची ज्या क्रुरतेने हत्या करण्यात आली या प्रकरणात कुठलाही राजकीय हस्ताक्षेपाला बळी न या प्रकणाचा निपक्षपाती तपास करावा , दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कमल वाढवावे , पिडीत परिवाराचे स्थानिक प्रशासनाने पुर्नवसन करावे तसेच गुन्हेगाराला जात नसते तो गुन्हेगार असतो यामुळे यानां मरेपर्यंत फाशीची शिक्षा लावण्यासाठी डीपीआय न्यायालयीन लढ्याचा पाठपुरावा करून पिडीत परिवार न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे व या परिवाराल मदत करण्याचे अवाहन डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी पिडीत परिवाराची भेटी प्रसंगी केले आहे
मराठवाड्यातील 'या' आमदारांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा; इच्छुकांची लॉबिंगही सुरु मराठवाड्यात शिवसेनेचे 12 आमदार असून, त्यापैकी नऊ आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ...