गेवराई दि २२ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील मादळमोही परिसरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे मादळमोही येथे एका रात्रीत सात घरे आज्ञात चोरट्यांनी फोडली असल्याची घटना ( दि २२ ) उडकिस आली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , मादळमोही ला कालच नारळी सप्ताहाची सांगता झाली असंख्य नागरिक या कार्यक्रमात होते बरेच लोक गावांत आले होते तसेच याठिकाणी ( दि २१ रोजी ) रात्री या गावांत आज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला एकाच गावातील सात घरे फुटल्याने परिसरात खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण नागरिकांत पसरले आहे तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्तळावर दाखल झाले आहेत श्वान पथकाला देखील याठिकाणी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती असुन घटस्तळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .