गेवराई दि २१ ( वार्ताहार ) तळणेवाडी या ठिकाणच्या एका युवकांला बनावट लग्न करून त्यांची फसवणुक केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल होता यातील मुख्य सुत्रधाराला शेवगांव येथून गेवराई पोलिसांनी अटक केली होती तसेच रात्री या प्रकरणातील नवरी मुलीचा बनावट मामा या औंरगाबाद या ठिकाणावरून गेवराई पोलिसांनी अटक केली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , विठ्ठल किसनराव पवार ( वय ३५वर्ष ) राहनार औंरगाबाद असे अटक करण्यात आले असलेल्या आरोपीचे नाव आहे गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथिल बनावट लग्न लाऊन दोन लाखांला गंडा घातल्या प्रकरणात नव वधू , तिचे नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे या प्रकरणात नवरी मुलीचा मामा म्हणून मिरवनाऱ्या मामाला आता अटक करण्यात आली आहे याने यापुर्वी देखील असे अनेकांना फसवले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असुन वरील आरोपीला आज गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी साजेद सिद्धिकी व यांनी दिली आहे .तसेच सदरची आरोपीला अटकेची कार्यवाई पोलिस उप अधीक्षक सोप्निल राठोड , पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , सहा पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , यांच्या मार्गदर्शनाखाली , एएस आय पारधी , पोना नवनाथ गोरे , विठ्ठल देशमुख यांनी केली आहे .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...