तरूणांच्या पोटात चाकू खुपसला;सार्थक हॉटेल जवळ घडली घटना

                             गेवराई दि २० ( वार्ताहार )
दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरालगतच्या पाढंरवाडी फाट्यावर असनाऱ्या सार्थक हॉटल जवळ दोन गटात अचानक वाद पेटला असल्याची माहिती सुत्रांनी दिली असुन या प्रकणात पाढंरवाडी येथील एका तरूणांला जमाव मारत होता त्यांनी गर्दीत एकाच्या पोटात चाकू खुपसला असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , साईनाथ शिवाजी मिठे ( वय ३५ वर्ष ) राहनार राजपिंप्री असे जखमी झालेल्या तरूणांचे नाव असुन दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एका दुसऱ्या तरूणाला दहा ते विस लोकांचा जमाव मारत होता तो तरूण पाढंरवाडी या ठिकाणचा असल्याची माहिती असुन त्यांने वरील तरूणांच्या पोटात आज्ञात कारणाने चाकू मारला व त्या ठिकाणावरून पसार झाला घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्तळावर दाखल व जखमीला गेवराई च्या उपजिल्हा रूग्णलयात आनले असुन त्याच्यावर उपचार सुरू आहेत तसेच हा वाद कश्यामुळे झाले यांचे कारण अद्याप समजू शकले नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *