April 19, 2025

अपघातात बिबट्या ठार;राष्ट्रीय महामार्गावरील घटना

                                 गेवराई दि १६ ( वार्ताहार )
बीड औंरगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या जवळ रस्ता ओलाडत असतांना बिबट्याला एका ट्रकने उडविले व या घटनेत बिबट्याचा दुर्दैवी अंत झाला असुन ही घटना आठच्या सुमारास घडली आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई शहराच्या बीड औंरगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेवराई बायपास वरील भारत पेट्रोलियम पंपासमोर रस्ता ओलाडत असतांना एक बिबट्या ट्रक अपघात ठार झाला आहे या अपघात झाल्यानंतर अनेकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .तसेच घटनास्तळावर पोलिस दाखल झाले आहेत तसेच ही माहिती पोलिसांनी वनविभागाला देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *