April 19, 2025

आझादी का अमृत मोहत्सवानिमित्त गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन

या मेळाव्यातील भव्य रोग निदान व उपचार शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्या – डॉ.एम.व्ही.चिंचोळे         

                     गेवराई दि १६ ( वार्ताहार ) 

दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. ” आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत जे विविध उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेवराई येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आसल्याची माहिती गेवराई उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

   दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या मेळाव्यामध्ये जनतेसाठी आरोग्य विभागामार्फत जे विविध कार्यक्रम राबवण्यात येतात त्यासर्व कार्यक्रमांची माहिती जनतेस व्हावी या साठी आरोग्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या आरोग्य प्रदर्शनात एकुण बारा स्टॉल ठेवण्यात येणार आसुन या ठिकाणी आलेल्या लाभार्थ्यांना आरोग्य विषयक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या स्टॉल्सच्या माध्यमातून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण , राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन , राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण , मानसिक आरोग्य , राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रम , नियीमत लसीकरण , कोव्हीड लसीकरण , एड्स नियंत्रण , पंतप्रधान जन आरोग्य योजना , महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना , संजीवनी बाहय रुग्ण सेवा , टेलीमेडीसन , आयुर्वेदीक उपचार व योगा इत्यादी या बाबत जनतेस माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य प्रदर्शनासोबतच सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असुन यामध्ये हृदयरोग , मधूमेह , अस्थीरोग , बालरोग , स्त्री रोग , शल्य चिकित्सा , कान नाक घसा , दंत चिकित्सा आयुष व युनानी , सोनोग्राफी व क्ष – किरण इत्यादी विषयाचे तज्ञ उपस्थित राहणार असुन रुग्णांचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत. तसेच बिनटाका कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास उच्छूक असणा – या महिलांना दि. १७/०४/२०२२ रोजी रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन करण्यात येत असुन आरोग्य मेळाव्यात जास्तीत जास्त जनतेने सहभाग नोंदवावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *