April 19, 2025

अभिषेक घालण्यासाठी पाणी आनायला गेलेल्या; दोन तरूणांचा गोदापात्रात बूडुन मृत्यू

                                     गेवराई दि १६ ( वार्ताहार )
तालुक्यातील निपाणी जवळका या ठिकाणी प्रतिवर्षी जोतिबा महराज यांची यात्रा गावांत भरत असते परंतू कोविड मुळे ही यात्रा गेल्या दोन वर्षापासुन भरलेली नव्हती याच वर्षी राज्य शासनाने सर्व नियम अटीनां शिथील केल्यानं यावर्षी साठी अभिषेक घालण्यासाठी राजापुर गोदापात्रातून पाणी आनण्यासाठी मध्य रात्री दोन वाजण्याच्या सुमारास निपाणी जवळका येथील दोन तरूण गेले होते त्यांचा पाण्यात बूडुन दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना राजापुर येथे घडली आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , शिवाजी ज्ञानदेव इंगोले ( वय १८ वर्ष ) मोहन नाना आतकरे ( वय १८ वर्ष ) दोन्ही राहनार निपाणी जवळका असे मयत तरूणांची नावे असुन अनेक गावांत यात्रेसाठी एक दिवस आगोदर जाऊन तिथल्या मंदिरात गोदावरीचे पाणी कावडीत आनुण त्यांचा अभिषेक घालायची पंंरपरा जुनी आहे. याच पंरपरेनूसार काल मध्य रात्री हे दोन तरूण कावड घेऊन राजापूरच्या गोदापात्रात गेले होते याठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्यांचा बूडुन मृत्यू झाला असल्याची घटना उघडकिस आली गावंकरी यांच्या मध्यस्थिने दोन्ही मृत्यूदेह गोदापात्राच्या बाहेर काढण्यात आले असुन उत्तरीय तपासणी साठी दोन्ही मयताला तलवाडा याठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आनले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *