महिला डॉक्टर चा विनयभंग करून मारहान ; तिघा विरोधात गुन्हा दाखल

आरोपीमध्ये वकीलाचा समावेश

                                         गेवराई दि १३ ( वार्ताहार )

हॉस्पीटलचा दारात रिक्षा ऊभा केला असता तो काढण्यासाठी सांगितले असता आरोपीनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून हात धरून विनयभंग केला तसेच मारहान केली असल्याच्या आरोपाखाली तिघाजनांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच या तिन्ही आरोपींना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच आरोपीमध्ये एक जन वकील असल्याचे समजते .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील गढी याठिकाणी डॉ पवार यांचे हॉस्पिटल आहे या समोर ( दुपारी १२ ) वाजण्याच्या सुमारास आरोपी गोरख सुर्यवंशी , यांने हॉस्पिटलच्या दारात रिक्षा  लावली तो काढण्यास सांगितले असता आरोपीने त्याचा भाऊ राहूल सुर्यवंशी ( वकील ) व वडिल भाऊराव सुर्यवंशी यांना बोलावून हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश करून माझ्या पतिला व मला मारहान करून वाईट हेतूने माझा हात पकडला तसेच माझी ओढणी ओढून माझा विनयभंग केला आहे असल्याची तक्रार महिला डॉक्टर यांनी गेवराई पोलिसांत दाखल केली आहे तसेच हा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असल्याची बाब समोर आली तसेच गेवराई शहरातील संपुर्ण डॉक्टरांनी ठाण्यात गर्दी केली होती तसेच वरील आरोपींना गेवराई पोलिसांंनी अटक केली असुन पुढील तपास पोलिस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *