दलित वस्तीत सुविधांचा अभाव;मागण्या पुर्ण न केल्यास आंदोलन
डीपीआय चा नगर परिषदेला ईशारा
गेवराई दि ५ ( वार्ताहार )
शहरातील साठे नगर संघामित्रा नगर मधिल दलित वस्तीत गेल्या पाच वर्षापासुन विकास कामे झाले नाहीत यामूळे या परिसरात मुलभूत हक्काच्या सुविधांचा अभाव आहे म्हणून यामध्ये वेळीच सुधारना न झाल्यास नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा डीपीआय चे विधी सल्लागार विधिज्ञ सोमेश्वर कारके यांनी दिला आहे .
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की साठे नगर , संघमित्रा नगर याठिकाणी दलित वस्ती आहे गेल्या पाच वर्षापासुन याठिकाणी विकास कामे झाली नाहित नाल्याच्या पाणी घरात घुसत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे तसेच या ठिकाणी नगर परिषदेच्या अंतर्गत लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट अनेक महिन्यापासुन बंदच आहेत यासह सर्वांत महत्वाचा विषय आहे पाणी याठिकाणी कमी दाबाने येते व वेळेवर पाणी पुरवठा केला जात नाही पंदरा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येतो तो चार दिवसांला करावा याशिवाय अनेक महत्वाच्या मागण्याचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना दिले असुन येत्या काळात या मागण्याची दखल न घेतल्यास नगरपरिषदे समोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशार डीपीआयचे विधी सल्लागार विधिज्ञ सोमेश्वर कारके , सय्यद माजेद , साईनाथ सुतार , गणेश सुतार ,मंगेश नाडे , अविनाश आव्हाड यांनी दिला आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...