विधिज्ञ ठोंबरे हल्ला प्रकरणातील दोन आरोपींना तिन दिवसांची पोलिस कोठडी
गेवराई दि २ ( वार्ताहार )
गेवराई येथील न्यायालयात वकीली व्यवसाय करनाऱ्या एका वकीलावर काल काही जणांनी जिवघेणा हल्ला चढवला यावेळी ते बालबाल बचावले असुन या प्रकरणी रात्री उशीरा गेवराई पोलिसांत तिन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व दोन जणांना गेवराई पोलिसांनी रात्रीच अटक केली आहे .त्यांना आज गेवराई येथील न्यायमुर्ती घुगे यांच्या न्यायलयात हजर करण्यात आले होते त्यांनी या दोन आरोपींना तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , गेवराई येथील न्यायालयात वकीली व्यावसाय करणारे विधिज्ञ शरद ठोंबरे यांचे गेल्याववर्षी पैशाच्या देवानघेवाणी वरून वाद झाला होता त्यांच जून्या भांडणाचा राग मनात धरून काल ( दि १ रोजी ) न्यायालयात काम करत असतांना यातील आरोपीने विधीज्ञ शरद ठोंबरे यांना धमकी दिली होती त्यानंतर ते आपले कामकाज करून घरी जाण्यासाठी निघाले असता ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळे समोर जिवे मारण्याच्या उद्देशाने स्कॉर्पियो गाडीने उडवले व दोन जण त्यांच्या पाठिमागे कोयता घेऊन लागले व त्यांनी त्याठिकाणी वरून पळ काढला व गेवराई पोलिसांत धाव घेतली या प्रकरणी रात्री उशीरा विधिज्ञ शरद ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून , दिनेश कानाडे , विठ्ठल कानाडे , गणेश धवलकर , तिन्ही राहनार गेवराई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातिल आरोपी दिनेश कानाडे व विठ्ठल कानाडे यांना अटक करण्यात आली आहे व एक आरोपी फरार आहे आज त्यांना गेवराई येथिल दूसरे न्यायमुर्ती घूगे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असुन या प्रकरणाचा पुढील तपास साहय्यक पोलिस निरीक्षक संदिप काळे हे करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...