गेवराई दि १ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था या शाखेचा भव्य शुभारंभ शनिवार दि.2 एप्रिल या दिवशी गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. या शाखेचा उद्घाटन सोहळा संत-महंतांच्या उपस्थित करण्यात येणार असून श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते शाखेचा शुभारंभ होणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था म.गेवराई या नव्याने सुरु होत असलेल्या कोळगाव शाखेचा आज गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ होत आहे. श्रीक्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते सकाळी 9 वा.धनलक्ष्मी पतसंस्था या अर्थ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री (श्रीक्षेत्र भगवानगडाच), महंत स्वामी जनार्दन महाराज (श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथगड निमगाव), महंत दत्ता महाराज गिरी (श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव), स्वामी शंकर महाराज (श्रीक्षेत्र भालकेश्वर संस्थान, मातोरी-तिंतरवणी), ह.भ.प.महंत सुरेशानंदजी महाराज (श्रीक्षेत्र श्रंगऋषीगड, शिंगारवाडी), ह.भ.प उध्दव महाराज (श्रीक्षेत्र माऊली संस्थान, नारायणवाडी), ह.भ.प.महंत दिगांबर महाराज पाडुळे (श्रीक्षेत्र अमृतेश्वर संस्थान, तांदळा), ह.भ.प.विशाल महाराज महारगुडे (संस्थान, गाढेवाडी) यांची उपस्थिती राहणार आहे. तर मार्गदर्शक म्हणून आर.एम.मोटे (सहाय्यक निबंधक, गेवराई), रविंद्रजी गिरी (सी.ए.) हे असणार आहेत. तरी या शाखेच्या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन अश्विनी विनोद नरसाळे, व्हाईस चेअरमन जयश्री अभिमान शेंबडे, सचिव छाया सुधाकर लोंढे, संचालक अर्चना मच्छिंद्र तकीक, सुनिता लोंढे, आशा पोपळे, सविता गवते, नौशाद शेख, आंबिका काचोळे, वर्षा शेंबडे आदींनी केले आहे.
पारदर्शक व्यवहाराबरोबरच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास धनलक्ष्मी पतसंस्था कटिबद्ध असणार आहे. बचतगट, नव उद्योजकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणण्यासाठी पतसंस्था सदैव कार्य करणार आहे. तसेच ग्राहकांना पतसंस्थेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून ग्राहकांचे हित हेच पतसंस्थेचे अभिवचन असणार आहे. सौ.अश्विनी विनोद नरसाळे चेअरमन, धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था म.गेवराई
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...