April 19, 2025

कास्ट्राईब महासंघाच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी अमोल आतकरे

कास्ट्राईब ने सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल ठरावं-बापूसाहेब ससाणे

                                   गेवराई दि २९ ( वार्तहार ) 

सामाजिक लोकशाही दृढ करायची असेल तर समाजात समता प्रस्थापित करावी लागेल आणि समते चा विचार अंगी बाणवण्यासाठी जाती पातीच्या भिंती गाडाव्या लागतील, आणि आज यानिमित्ताने कास्ट्राईब महासंघाने एक ऐतिहासिक निर्णय करत मराठा समाजातील एका तरूण उमद्या शिक्षकावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याच रोखठोक प्रतिपादन कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय महासचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब ससाणे यांनी केले.ते बीड येथील सामाजिक न्याय भवनात आयोजित छोटेखानी नुतन पदाधिकारी स्वागत व सन्मान सोहळ्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते. या कार्यक्रमास कास्ट्राईब चे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब दहिफळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रेड मुख्याध्यापक श्री.एस.वाय. सुतार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बाबद सविस्तर माहिती अशी  की, कास्ट्राईब महासंघ म्हणजे अनू. जाती, जमाती, इतर मागास यांच्यापुरतीच संघटना असल्याचे आजवर मानले जायचे, मात्र२०१४ पासुन राज्याच्या महासचिव पदाची सुत्रे बापूसाहेब ससाणे यांनी सांभाळल्यानंतर महासंघात बरेच व्यापक बदल केलेले आहेत. राज्य पर्यवेक्षिका संघ, राज्य आरोग्य कर्मचारी संघ, राज्य समाजकल्याण कर्मचारी संघ अथवा राज्य लघुलेखक कर्मचारी संघ अशा विविध संलग्न शाखा उभारून कास्ट्राईब चा विस्तार केलेला आहे. या विविध संलग्न शाखांमधुन अनेक मराठा व इतर तत्सम समाजातील कर्मचाऱ्यांना कास्ट्राईब च्या प्रवाहाशी जोडुन त्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. मात्र मुख्य शाखांमध्ये असे बदल करण्याचे या ना त्या कारणाने पुढे पुढे ढकलले गेले होते.

 म्हणुनच आज त्याच दृढ संकल्पान्वये बीडच्या सामाजिक न्याय भवनात कास्ट्राईब महासंघाने एक छोटेखानी बैठक आयोजित करून जि.प.शाळा काॅरी वस्ती(बेलगाव) ता. गेवराई येथे कार्यरत असलेले हरहुन्नरी शिक्षक अमोल रामराव आतकरे या मराठा समाजातील उमद्या, तरूण शिक्षकाची महासंघाच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. यापुर्वी त्यांनी पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष पद आठ-दहा वर्षे अगदी हिरीरीने सांभाळलेले आहे. त्यांच्यासमवेत कार्यरत असलेली सर्व टिम देखील महासंघात दाखल झालेली असुन त्या सर्वांचे कास्ट्राईब महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यथोचित सन्मान करत महासंघात प्रवेश दिला आहे.

अमोल आतकरेंच्या निवडीने तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात अनेक नवी समिकरणे तयार होणार असुन जुनी समिकरणे अनेकांना बदलावी लागतील अशी 100%खात्री असुन नजिकच्या काळात कास्ट्राईब महासंघ अधिक खंबीर आणि कणखर भुमिकेत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र दिसेल याबद्दल शंका वाटत नाही. याप्रसंगी श्री. अमोल आतकरे यांचा नियुक्त पत्र ,शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन कास्ट्राईब चे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब दहिफळे, जिल्हा उपाध्यक्ष एस.वाय.सुतार व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब ससाणे यांनी व उपस्थित सर्वांनीच सत्कार केला. त्यांचे समवेत उपस्थित असलेल्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात अमोल मनकटवाड यांचाही महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.

नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी, आकाश जाधव, विश्वभुषण सोनवणे, वायभसे सर आदींनी आपापली मते मांडत नवनियुक्त अमोल आतकरे सरांना शुभेच्छा देऊन मी शतः प्रतिशत सहकार्य देऊ अशी ग्वाही दिली. तर नियुक्तीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अमोल आतकरे सरांनी आपल्यावर सोपवलेली हि मोठी जबाबदारी आपण प्रामाणिक पणे पार पाडुन शिक्षक व इतर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना भक्कम असे पाठबळ देऊ याची ग्वाही देऊन कास्ट्राईब च्या सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

बैठकीचे सूत्रसंचालन कास्ट्राईब चे गेवराई तालुका सरचिटणीस सुनिल सुतार यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वभुषण सोनवणे यांनी मानले. या नियुक्तीप्रसंगी रोहन कांडेकर, सुहास भोले, आकाश जाधव, विश्वभुषण सोनवणे, सुनिल सुतार, एस.वाय. सुतार, बाळासाहेब दहिफळे, अमोल मनकटवाड, उमेश ढेपे, सुनिल राठोड, महादेव कारंडे, राहुल घाडगे, चंद्रकांत हराळे,सिरमेवाड सर, राम जोशी सर,मिलिंद सोनवणे आदींसह अनेक शिक्षक आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *