April 19, 2025

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल; शहरातील घटना

                  गेवराई दि २६ ( वार्ताहार )

गेवराई शहरातील आहिल्यानगर भागात राहनाऱ्या एका (२९)वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , शंकर दिलीप मोरे ( वय ३२ वर्ष ) राहनार राजपिंप्री हमु शिवाजी नगर गेवराई असे आरोपीचे नाव असुन त्यांचे कापड दुकान आहे दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आहिल्यानगर येथील ( २९ वर्षीय ) विवाहित महिला गेली असता तिला कपडे दाखवण्याच्या बाहान्याने वाईट उद्देशाने स्पर्ष केला तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आला आहात म्हणून चहा घ्या म्हणून बऱ्याच वेळ थांबवले तसेच कपड्याचे बील तयार करून त्यांच्यावर मोबाईल नंबर मागितला व त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे असे सांगितले त्यांतर शासकिय आयटीया परिसरात बोलावले त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून माझ्या अंगाला झोंबाझोंबी केली तसेच माझ्यावर ईच्छा नसतांना अतिप्रसंग केला मी त्याठिकाणावरून निघून गेले परत मला वरिल आरोपी फोन करून बोलू लागला तु जर नाही आली तर मी तुझ्या घरी येईल नविन बसस्थानकावर ये त्याठिकाणी गेल्यानंतर माझ्याशी गोड बोलून मी तूझ्याशी लग्न करतो तुझे मुले संभाळतो असे सांगून मला बळजबरीने रिक्षात बसवून मादळमोही याठिकाणी साईराज लॉजवर घेऊन जाऊन माझ्या ईच्छेविरूद्ध माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले व त्यानंतर मी त्याला लग्नाबाबद विचारना केली असता तू पारधी समाजाची आहेस तुम्हाला कसली ईज्जत जर ही गोष्ट कुनाला सांगितली तर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली सदर विवाहतेला आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येता तीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या मोठ्या बहिनीला व भावाला सांगितला त्यांनी याबाबद गेवराई पोलिसांत धाव घेतली पिडीतेच्या तक्रारीवरून या प्रकरणी अनुसुचित जातीजमाती अत्याच्यार प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचाच्या आरोपाखाली वरिल आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक सोप्नील राठोड करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *