April 27, 2025

हिंगनगावच्या गोदापात्रात पोलिस अधीक्षक पथकाचा छापा

दोन ट्रॅक्टर , एक हायवा , एक रोटर सह एक कोटीचा मुद्देमाल जप्त

                       गेवराई दि २५ ( वार्ताहार )

तालुक्यातील हिंगनगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पथकाला मिळाली होती त्यावरून त्यांनी गोदापात्रात छापा टाकला या केलेल्या कार्यवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .

    या बाबद सविस्तर माहिती अशी की , सध्या गेवराई तालुक्यात वाळू माफियांनी नंगा नाच चालवला आहे बीड पोलिस देखील एक्शन मोडमध्ये आहेत तालुक्यातील हिंगनगाव परिसरात अनाधीकृत वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती त्यांनी यांची खातरजमा करून  काल ( दि २४ ) च्या रात्री  आठ वाजण्याच्या सुमारास हिंगनगावच्या गोदापात्रात छापा टाकला त्याठीकाणी दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर , एक हायवा , एक ट्रॅक्टर रोटर ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाईसाठी ही वाहने तहसिल कार्यलयाच्या परिसरात जमा करण्यात आली असुन सदरची कार्यवाई ही पोलिस अधीक्षक पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धोकरट, पोलिस नाईक गणेश धंनवडे ,पोलिस शिपाई गोविंद काळे, पोलीस शिपाई अभिजीत दहिवाळ, यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *