शिवसेनेचे पप्पू तेलुरे यांचा असंख्य कार्यकर्त्यासहराष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
गेवराई दि २२ ( वार्ताहार )
जुन्या – नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला, तलवाडा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते पप्पूसेठ तेलुरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला.
मंगळवार दिनांक २२ मार्च रोजी तलवाडा येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते पप्पूसेठ तेलुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तलवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सुभाष महाराज नागरे, सरपंच विष्णु हात्ते, अज्जू सौदागर, गणेश बांगर, नामदेव काळे, भाऊसाहेब माखले, बाबासाहेब आठवले, बळीराम शिंदे, गणेश कचरे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सचिन जाधव, पांडुरंग गायकवाड, गणेश मरकड, दिपक उबाळे, गोटु नाटकर, सचिन चव्हाण, विक्रम मरकड, माऊली धनवडे, लक्ष्मण मरकड, नितीन मरकड, चंद्रकांत नाटकर, संभाजी नाटकर, धनंजय निकम, वैजिनाथ जगदाळे, पांडुरंग गायकवाड, आनंद डोंगरे, रमेश आठवले, सुमेध करडे, सुभाष भोले, भोले मामा, भाऊसाहेब हातागळे, विनोद आठवले, एजाज कुरेशी, जावेद कुरेशी, हरिभाऊ कातखडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.
पुढे बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले जातील. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी आप-आपसातील हेवे-दावे विसरून सर्वांनी समन्वय साधून काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत-जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला दादा रोकडे, नजिरभाई कुरेशी, साहेबा कुऱ्हाडे, बळीराम शिंदे, मिठुभाई, रमेश खोपडे, पप्पु समगे, दुर्वेश यादव, जनार्धन आखरे, जगदिश धुमक, बाबासाहेब जायगुडे, संताराम निकम, किरण वावरे, आकुश वावरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...