वाळुच्या चार  हायवासह वाळू साठ्यावर पंकज कुमावत यांची कार्यवाई ; दोन कोटीचा मुद्देमाल जप्त

                                  गेवराई दि २२ ( वार्ताहार )

तालुक्यातून अवैध वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी या अनाधीकृत हायवा विविध ठिकाणावरून सापळा लाऊन पकडल्या आहेत या कार्यवाईत चार वाळू्च्या हायवा ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच वाळू साठे देखील जप्त केले आहेत  कार्यवाईत त्यांनी दोन कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .

  या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातून चार हायवा राक्षसभूवन , सावरगाव , खामगांव परिसरातून वाळूने भरून हायवा  निघाल्या आहेत अशी माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी गेवराई तालुक्यातील सावरगाव, राक्षसभूवन, खामगांव , या ठिकाणी आपल्या पथकासह छापा टाकला तसेच याठिकाणी वेगवेगळे वाळू माफियांनी केलेले साठे देखील जप्त करण्यात आले आहेत आणि चार वाळूने भरून चाललेल्या हायवा गाड्या पकडण्यात त्यांना यश आले आहे सदरची कार्यवाई ही आज ( दि २२ रोजी ) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे मात्र ही दूसरी मोठी कार्यवाई आहे यापुर्वी गेल्या आठ दिवसांपुर्वी सावरगाव परिसरात या पथकाने कार्यवाई केली होती यामध्ये तिन कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता तसेच पथकावर देखील वाळू माफिया कडून हल्ला झाला होता मात्र त्याच्या काही दिवसांनंतरच ही सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची दूसरी कार्यवाई आहे या कार्यवाईने वाळू माफियात मोठी खळबळ माजली आहे . सदरच्या जप्त केलेल्या चार  हायवा गेवराई पोलिस ठाण्यात पुढील कार्यवाई साठी आनण्यात आल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *