January 22, 2025

इयर इशेल यांची युधाजित पंडितांच्या केशर आंबा बागेला भेट; तंत्रज्ञानाच्या वापराचे केले कौतुक              

             गेवराई दि २० ( वार्ताहार ) 

इस्रायल देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि योग्य खत व पाणी यांचा वापर करून आपल्या कृषी क्षेत्राची जगभर ख्याती पसरवली आहे. त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या देशातही अनेक शेतकरी शेती करत आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्राईलचे राजदूत इयर इशेल यांनी थेट गेवराई येथे प्रगत शेतकरी तथा जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी फुलवलेल्या केशर अंबा बागेला भेट देऊन, पाहणी केली. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याचे पाहून त्यांनी युधाजित पंडीत यांचे कौतुक केले आहे.

    इस्रायलचे आपल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, आपल्या कृषी क्षेत्राचा सर्वत्र डंका वाजवला आहे. पाणी आणि खत याचे योग्य नियोजन करून, कमी क्षेत्रात अधिक पीक घेण्याची त्यांची पद्धत, भारतातील अनेक शेतकरी आपल्या शेतीत वापरत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि प्रगत शेतकरी जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी आपल्या गेवराई- बीड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत गोविंदवाडी तलावाजवळ असलेल्या शेतामध्ये, इजराइलच्या कृषी विभागाशी सलग्न असलेल्या फळ संशोधन केंद्र औरंगाबाद यांच्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञान वापरून केशर आंबा बाग फुलवली आहे. या आंबा बागेची चर्चा सर्वत्र होत असून, दररोज राज्यातल्या विविध जिल्ह्यातले शेतकरी बागेला भेट देऊन माहिती घेत आहेत. दिनांक 20 मार्च रोजी इस्राईलचे राजदूत इयर इशेल यांनी दुपारी गेवराई येथे येऊन प्रत्यक्ष शेतात जाऊन बागेची पाहणी केली. बागेचे बारकाईने निरीक्षण करून त्यांनी विविध मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्यासमवेत फळ संशोधन केंद्र औरंगाबादचे प्रमुख एम बी पाटील, माजी सभापती युधाजित पंडीत यांची उपस्थिती होती. यावेळी राजदूत इयर इशेल म्हणाली की, अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीत युधाजित पंडीत यांनी इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय योग्य पद्धतीने केशर आंबा बाग फुलवली आहे. प्रत्येक झाडाची योग्य वाढ झाली असून, अपेक्षेप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा अधिक फळे झाडाला लगडली आहे. पुढच्या वर्षी याहीपेक्षा अधिक फळ या झाडांना लागणार असल्याचे सांगून, शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून शेती करत आपली आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन केले. तरुण असलेल्या युधाजित पंडीत यांनी कृषी क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत, प्रगत शेती करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी असल्याचेही इयर इशेल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *