April 19, 2025

पोलिस अधीक्षक पथकाची गोदापात्रात मोठी कार्यवाई; तिन कोटीचा मुद्देमाल जप्त

                              गेवराई दि १६ ( वार्ताहार )

तालुक्यातील खामगांव परिसरात अचानक पणे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह गोदापात्रात छापा मारला व यामध्ये वाळू उपसा करणाऱ्या गाड्यासह जवळपास तिन कोटीचा मुद्देमाल या कार्यवाईत जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील खामगांव , व शहागडच्या पुलाखाली दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती प्रक्षीणार्थी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली त्यांनी सदर प्रकणाची खातरजमा करून आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खामगांव गोदापात्र शिवारात त्यांनी आपल्या पथकासह छापा मारला या कार्यवाईत दोन हायवा , एक मोठा ट्रक , वाळू उपसा करणारे रोटर , व टेम्पो वाळू उपसा करणाऱ्या केन्या , असे मिळून जपळपास तिन कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरची वाहने व सामग्री घेऊन पथक गेवराईच्या बसस्थानक परिसराच्या आगारात ह्या गाड्या लावण्यात आल्या आहे तसेच कार्यवाई दरम्यान रोटर पळवून नेण्यात माफियांना यश आले आहे लवकरच या प्रकरणी पुढील कार्यवाई केली जाईल अशी प्राथमिक माहिती आहे तसेच या कार्यवाईने वाळू माफियांत मोठी खळबळ उडाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *